प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा, शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध- ना. आदिती तटकरे



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26-  समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासह सर्व घटकांच्या विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असून या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन  राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क  राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री  ना. आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यास निवृत्त ॲडमिरल एल. रामदास सपत्निक उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीत झाले.
त्यानंतर मोठ्या दिमाखदार पणे पार पडलेल्या संचालनात पालकमंत्री ना. तटकरे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर शानदार परेड संचलन होऊन पालकमंत्र्यांनी मानवंदना स्विकारली. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना गौरविण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित निवृत्त ॲडमिरल एल. रामदास तसेच उपस्थित स्वातंत्र्यसैनिक यांची भेट घेऊन  ना. तटकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.  या सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आपल्या भाषणात पालकमंत्री ना.तटकरे म्हणाल्या की,  राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या हेतुने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत आपल्या जिल्ह्यात दहा हजार तीनशे सत्तावन्न लाभार्थ्यांना 56.66 कोटी रक्कम मिळणार आहे.  आज राज्यभर गरीब, गरजू लोकांसाठी शिवभोजन योजना सुरु करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातही चार ठिकाणी या योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे. यासाठी आवश्यकतो निधीही उपलब्ध झाला आहे. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन करतांना जिल्हा नियोजन समितीने सन 2020-21 या वित्तीय वर्षासाठी (सर्वसाधारण) 189.64 कोटी, टी.एस.पी. 32.98 कोटी, एस.सी.पी.24.94 कोटी अशा एकूण 247 कोटी 56 लक्ष रुपयांच्या जिल्हा विकास आराखडा तयार केला असून त्यात विकास कामे करण्यासाठी निधीची भरीव तरतूद केली आहे. यामध्ये जिल्ह्यात पुढील वर्षी महत्वपूर्ण योजना म्हणून जिल्ह्यातील सर्व महत्वपुर्ण अशा बांधकामासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.  नाविन्यपूर्ण योजनांतर्गत पुढीलवर्षी रुग्णांसाठी स्पीडबोट तयार करण्याची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.
इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थीनींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व शाळेतील उपस्थिती वाढून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मुलींना सायकल पुरविणे हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून यामध्ये शाळा ते घर हे अंतर 5 कि.मी. पेक्षा जास्त असल्यास अशा मुलींना प्राधान्याने सायकल देण्यात येणार आहे. रायगड जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. बांधलेल्या शौचालयाचा नियमित वापर करणे, पर्यावरणासाठी शंभर टक्के प्लॉस्टिकबंदीसह, कचरा व्यवस्थापन या समस्येसाठी  सर्वांनी संघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत ग्रामीण भागातील प्रौढ व अकुशल मजूरांना मागणीप्रमाणे काम उपलब्ध करुन देणे, ग्रामीण भागात सामुहिक व वैयक्तिक कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची मालमत्ता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. निर्माण होणाऱ्या सामुहिक मालमत्तेच्या माध्यमातून गावाचा विकास करणे व पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावणे या योजनेमधून अभिप्रेत आहे.  जॉबकार्ड धारक शेतकऱ्यांना भात खाचर दुरुस्तीचा लाभ दिल्यास त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन प्रत्यक्ष आर्थिक उत्पन्नात वाढ होईल व त्यांचे जीवनमान उंचावणे शक्य होईल.  जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात भात खाचर दुरुस्तीची कामे सुरु करण्यात येत आहेत.
गट शेती योजने अंतर्गत जिल्हयात 10 गट कार्यरत असुन त्यांना रु.2 कोटी शासनाने वितरीत केले आहे. या योजने मध्ये 60 टक्के अनुदान देय आहे. या वर्षी नविन 27 गटांना पुर्व संमती देण्यात आली आहे. राज्य शासनाची हि अत्यंत उपयुक्त योजना असुन जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
नाचणी पिकास केंद्र शासनाने पौष्टिक अन्न धान्य म्हणुन मान्यता दिली असुन शेतकऱ्यांच्या 180 हे. क्षेत्रावर 100 टक्के अनुदानावर प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य योजने अंतर्गत 7500 किलो व भात पड क्षेत्रा मध्ये कडधान्याचे उत्पादन वाढ विण्यासाठी (TRFA PULSES) कार्यक्रम अंतर्गत 19200 किलो हरभरा पिकाचे बियाणे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले आहे. रायगडच्या सुप्रसिध्द पांढरा कांदा व सुपारी या पिकांना भौगोलिक मानांकन देण्यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. शेतकऱ्यांच्या शेत मालाची उत्पादकत्ता व उत्पन्न सन 2021-2022 पर्यंत वाढविण्यासाठी जिल्हा, उपविभाग, तालुका स्तरावर 21 शेतकरी सन्मान व मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
मत्स्यव्यवसाय हे एक मोठे रोजगारनिर्मितीचे आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी आणि मच्छिमार बांधवांच्या सोयी सुविधांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून जिल्ह्यातील वरसोली, चाळमाळ, कोंधरीपाडा, मुरुड, बोर्ली मांडला येथील मत्स्य केंद्रांचा विकास करण्यात आला आहे. यामध्ये वरसोली, चाळमाळ, कोंधरीपाडा, बोर्ली मांडला ही कामे पुर्णत्वास आली आहेत. तर मुरुड, वरेडी पेण येथील कामे प्रगतीपथावर आहेत. नाबार्डच्या अर्थसहाय्यातून थेरोंडा, एकदरा, नवापाडा, बोर्ली मांडला, दिघी, राजपुरी, नांदगाव बंदर विकासाची कामे मंजूर झाली आहेत. यामध्ये नवापाडा येथील काम पुर्णत्वास आले आहे. तर थेरोंडा, एकदरा, बोर्ली मांडला, दिघी, राजपुरी, नांदगाव येथील कामे प्रगतीपथावर आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री ना.तटकरे यांच्या हस्ते पोलीस जनजागृती मोबाईल व्हॅनचे उद्घाटन झाले. विविध गुन्ह्यांना  आळा व प्रतिबंध करण्यासाठी पोलीस जनजागृती मोबाईल व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे.
विशेष कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान
या समारंभात जिल्ह्यात विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पालकमंत्री ना. तटकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्या सन्मानार्थींची नावे या प्रमाणे-


पोलीस दलातील नक्षलग्रस्त विभागात 3 वर्ष समाधानकारकपणे सेवा पूर्ण केल्याबद्दल नितीन केशवराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पेण. नामदेव विठ्ठल बंडगर, पोलीस निरिक्षक, रोहा पोलीस ठाणे. रविंद्र पितांबर शिंदे, पोलीस निरिक्षक, जिल्हा विशेष शाखा, रायगड.  कुंदन तुकाराम गावडे, सहा. पोलीस निरिक्षक, अलिबाग पोलीस ठाणे. सागर प्रल्हाद पवार,पोलीस उप निरिक्षक, एमआयडीसी महाड पोलीस ठाणे. सहाय्यक फौजदार विलास तुकाराम जंगम-सन 1984 ते आजतागायत सुमारे 36 वर्ष प्रजासत्ताक दिन, स्वातंत्रय दिन, महाराष्ट्र दिन इत्यादी राष्ट्रीय सणांचे वेळी ध्वज बांधण्याचे विधीवत काम अविरत व  चोखपणे केलेले आहे. त्यांनी आतापर्यंत बजावलेल्या अविरत कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. नेहरु युवा केंद्र, अलिबाग रायगड (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) च्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा उत्कृष्ठ युवा मंडळाचा पुरस्कार देऊन गौरव -2019 – सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान मु.रोहा,ता.रोहा (रोख रु.25000/-सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र) स्वच्छ भारत इंटर्नशिप या कार्यक्रमात स्वच्छ विषयक कामाबाबत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार-नितीश दिलीप भदवकर, (रोख रक्कम 30,000 सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र) लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार-2019-प्रथम पुरस्कार-श्रीमती मिताली महेश कदम,  (रोख रु.15,000 सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ). द्वितीय पुरस्कार-संजय लक्ष्मण कदम, (रोख रु. 10,000/-सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ) जिल्हा क्रीडा पुरस्कार-(पुरस्काराचे स्वरुप- रोख रु.10,000/-प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह) प्रतिक्षा बबन गायकवाड, (एशियन पॉवरलिफ्टींग ओपन 72 किलो वजनी गटात प्राविण्य) गुणवंत खेळाडू (महिला):-कु.ऋतुजा संजय खेंडके, (सन 2014-15 व 2017-18 मध्ये वरिष्ठ जिल्हा अजिंक्य स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहे. त्यांना एकूण 06 गुण प्राप्त झाले आहेत. गुणवंत खेळाडू(पुरुष):-कु.वेदांत उद्धव कुथे, (वरिष्ठ व कनिष्ठ अजिंक्य स्पर्धेत सहभागी तसेच सलग 2015-16 त सन-2018-19 पर्यंत राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असून एकूण 31 गुण प्राप्त केले आहेत.) गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरुषोत्तम नामदेव पिंगळे, (जिल्हास्तरीय विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीयस्तरावर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे तसेच स्पर्धांचे आयोजन आपल्या स्तरावर करुन 20 गुण प्राप्त केले आहेत.)  गुणवंत क्रीडा मार्गदर्शक भरत प्रल्हाद गुरव यांनी घडविलेले खेळाडू कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा, वरिष्ठ अजिंक्य स्पर्धा, राज्य शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रिडा स्पर्धा तसेच वरिष्ठ जिल्हा अजिंक्य स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केले असून त्यांना 16 गुण प्राप्त झाले आहेत. चेतन पाशिलकर दिव्यांग चित्रकार, लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चे निवडणूकीचे उत्कृष्टरित्या कामकाज केल्याबद्दल दिव्यांग बुथ कर्मचाऱ्यांचा गौरव साईनाथ पवार, संतोष शंकर माने, राकेश सावंत, शैलेश सोनकर, अप्पा काळेल, निधी धमेंद्र पुगावकर, चेतन पाशिलकर, शासकीय समारंभाचे निवेदन करणाऱ्या निवेदिका श्रीमती किरण करंदिकर
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजरोहण व मानवंदना
प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस वाद्यवृंदाने वाजविलेल्या राष्ट्रगिताच्या धुनवर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती यांच्या सह विविध शाखांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000





Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक