निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतनधारकांचा फरक लवकरच अदा रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन


                                            
अलिबाग-दि.28(जिमाका:- डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अलिबाग शहरातील बी.एस.एन.एल. (BSNL) इंटरनेटची सेवा विस्कळीत झाली आहे. बरेच वेळा ती बंद असल्यामुळे या कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखेतील निवृत्तीवेतन देयक संगणक प्रणालीतून तयार करण्याचे कामही विस्कळीत झालेले आहे.  याबाबत बी.एस.एन.एल. (BSNL)कार्यालयाकडे चौकशी केली असता पेण- खोपोली महामार्गाच्या रुंदीकरण कामामुळे ओ.एफ.सी. ही मुख्य केबल सारखी तुटत असल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. इंटरनेट सुविधा विस्कळीत असल्याने देयके तयार करणे, लेखा शाखेमध्ये ती तपासून ऑनलाईन सी.एम.पी. तयार करणे यामध्ये अडचणी येत आहेत. तसेच देयके मंजूर करुन सी.एम.पी. केल्यानंतरही काही निवृत्तीवेतन धारकांच्या बँक खात्यामध्येही रकमा जमा होताना अडचणी येत आहेत.
तसेच MDC पेन्शन यांच्याकडून संचलनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांना प्राप्त झालेल्या ई-मेल संदेशान्वये तीन वर्षापासून निवृत्तीवेतन आज्ञावली (Pension Software) विकसनाचे आणि देशभालीचे काम महा. आय.टी. यांना देण्यात आलेले आहे. 1 जानेवारी 2020 पासून सदर यंत्रणा बंद आहे. महा.आय.टी.चे संगणक तज्ञ सदरची यंत्रणा चालू करण्याचे प्रयत्न करीत आहेत. तरी जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्तीवेतन, कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांना कळविण्यात येते की, यंत्रणा चालू झाल्यानंतर व अचुक फरक अदा करण्याची आज्ञावली (Software) तयार झाल्यानंतर कोषागारातील कर्मचारी,अधिकारी दिवस रात्र एक करुन काम करुन निवृत्तीवेतनधारकांचा,कुटूंब निवृत्तीवेतनधारकांचा फरक अदा करण्याचा प्रयत्न करतील. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड-अलिबाग डॉ. फिरेाज मुल्ला यांनी केले.
000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक