शिवभोजन थाळी उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभरंभ



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26-    राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क  राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री  ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते शिवभोजन आहार योजनेचा शुभांरभ सुरभी भोजनालय अलिबाग येथे आज झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकरी सुनिल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे यासाठी शासनाने शिवभोजन आहार योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग येथे 2 व पनवेल येथे 2  अशा 4 ठिकाणी नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दुपारी 12.00 ते 02.00 या वेळेत भोजन उपलब्ध होणार असून या शिवभोजन थाळीची किंमत फक्त रु. 10/- प्रती थाळी राहणार आहे. गरीब, गरजू, सर्वसामान्य व्यक्तींची भूक शमविण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक