रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हाळ येथे रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन




अलिबाग-दि.28(जिमाका:- सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाचे रायगड जिल्ह्याचे 45 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन तसेच  विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा आहे.  रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रायगड अलिबाग व जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त  विद्यमाने याक पब्लिक हायस्कुल, हाळ, खोपोली, ता. खालापूर जिल्हा रायगड येथे शुक्रवार दि.31 जानेवारी 2020 ते 2 फेब्रुवारी 2020 रोजी या कालावधीत संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री, उद्योग,खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन,क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, तसेच माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. तर रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा कु. योगिता पारधी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
या कार्यक्रमास विशेष  अतिथी-  लोकसभा सदस्य  खा. श्रीरंग बारणे,खा. सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य आम. जयंत पाटील,आम.बाळाराम पाटील,आम.निरंजन डावखरे,आम.अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य-आम.भरत गोगावले,आम. प्रशांत ठाकूर, आम.रवि पाटील, आम. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, आम. महेश बालदी,तसेच श्रीम.निधी चौधरी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग, दिलीप हळदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद,अलिबाग,सुधाकर घारे, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, सुनिल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, रायगड अलिबाग.
प्रमुख अतिथी-ॲड. निलिमा पाटील, विषय समिती सभापती, रायगड जिल्हा परिषद,अलिबाग, दिलीप भोईर, सभापती, समाज कल्याण समिती, रायगड जिल्हा परिषद,अलिबाग, गिता जाधव, सभापती, महिला व बालकल्याण समिती, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग,बबन मनवे, विषय समिती सभापती, रायगड जिल्हा परिषद,अलिबाग,सुरेंद्र म्हात्रे, विरोधी पक्षनेता, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग,ॲड.आस्वाद पाटील, पक्ष प्रतोद,शेतकरी कामगार पक्ष, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग,बबन चाचले,पक्ष प्रतोद,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग,बाजीराव परदेशी, पक्ष प्रतोद,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग,मानसी दळवी, पक्ष प्रतोद, शिवसेना, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, अमित जाधव, पक्ष प्रतोद, भारतीय जनता पार्टी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग,सुश्रुता पाटील,शिक्षण व क्रीडा समिती सदस्या, मोतीराम ठोंबरे, शिक्षण व क्रीडा समिती सदस्य,प्रभाकर म्हात्रे, शिक्षण व क्रीडा समिती सदस्य,आरती मोरे, शिक्षण व क्रीडा समिती सदस्य,रेश्मा शेळके, शिक्षण व क्रीडा समिती सदस्य,जितेंद्र सावंत, शिक्षण व क्रीडा समिती सदस्य,पद्मा पाटील, जिल्हा परिषद सदस्य, रणधीर सोमवंशी, अतिरिक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी,रायगड जिल्हा परिषद, अलिबाग,दत्तात्रय पाथरुट, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, वृषाली पाटील, सभापती पंचायत समिती खालापूर, सुमन ओसरमल, नगराध्यक्ष,नगरपालिका खोपोली, इरेश चप्पलवार, तहसिलदार खालापूर हे उपस्थित राहाणार आहेत.
समारोप व पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी  साडेतीन वाजता रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा कु. योगिता पारधी, व रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सुधाकर घारे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे, असे भाऊसाहेब थोरात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक