कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते उद्घाटन



अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)- कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2020 रायगड क्रीडा नगरी,रिलायन्स क्रीडा संकुल नागोठणे ता.रोहा येथे दि.28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 या कालावधीत संपन्न होत आहे.  या स्पर्धेचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते संप्पन झाले.
  यावेळी खासदार सुनिल तटकरे, राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौड,  जिल्हाधिकारी रायगड श्रीमती निधी चौधरी, जिल्हाधिकारी ठाणे राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग मंजू लक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन महसूल मंत्री श्री.थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड भूमित ही महसूल क्रीडा स्पर्धा होत आहे याचा मला मनस्वी आनंत होत आहे.    महसूल हा प्रशासनाचा कणा असून महसूल विभागात काम करणारे अधिकारी, कर्मचारी जनतेची सेवा करण्याचे काम करतात.   व्यवहारीक जीवनात विरंगुळा मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याचा सर्वांनी आनंद घ्यावा.  सह्याद्रीच्या पर्वत रांगा एका बाजूला समुद्र असा हा वैभवशाली कोकण असून येथे होणाऱ्या या कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूने खेळताना जिंकण्याची जिज्ञासा ठेवावी.  महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वय ठेवून जनतेचे सेवक म्हणून चांगले काम करावे.     
पालकमंत्री श्रीमती आदिती तटकरे म्हणाल्या की, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी  यांनी समन्वय ठेवून काम केल्यास आपल्याला कामाचे जे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे ते पूर्ण करता येते.  कोकण विभाग पर्यटन क्षेत्र म्हणून मानला जातो.  जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असते. कोकण विभागात विभागीय क्रीडा संकुल उभे रहावे अशी सर्वांची अपेक्षा आहे तीही लवकरात लवकर पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महिलांनी या स्पर्धेत अधिकाधिक सहभाग घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार सुनिल तटकरे तसेच कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनीही आपली यथोचित मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी करुन कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची रुपरेषा व  महत्व  विशद करुन सांगितले.  तर आभार अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी मानले.  कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्वजारोहण करुन करुन मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  सुरुवातील छावा युवामंच सातारा यांनी शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके करुन दाखविली.   तर सांस्कृतिक फाऊंडेशन कलामंच ठाणे यांनी सांस्कृतिक कलेचे सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी मुंबई शहर,मुंबई उपनगर, ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक