दि.01 मार्च ते 03 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर


कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या !

अलिबाग,दि.04 (जिमाका) : जे नागरीक दि.01 मार्च ते 03 एप्रिल 2020  दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे-
एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले व करोना ‘+’ ve  नागरीकांच्या संपर्कात आल्याने निरीक्षणाखाली असलेल्या नागरिाकंची संख्या - 1 हजार 646. निरीक्षणाखाली असलेल्या परंतू 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले नागरिक- 1 हजार 185, घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) असलेले नागरिक-269, उपचारानंतर बरे झाल्यामुळे भाभा हॉस्पिटल (Isolation) मधून घरी पाठविण्यात आलेले व घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) समाविष्ट केलेल्या नागरिकांची संख्या -1, या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Quarantine) असलेले नागरीक-178. मुंबई कस्तुरबा रुग्णालय येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेले नागरिक-05 दाखल रुग्णांच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे.
सेव्हन हिल हॉस्पिटल, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-01 असून या नागरिकाच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे. मुंबई फोर्टीज हॉस्पिटल मुलूंड येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-02 असून या नागरिकाच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे. MGM रुग्णालय पनवेल येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक-06 असून या नागरिकाच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे.
परदेशी प्रवास करुन परतलेल्या नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-257, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-221, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-192, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या-14, तपासणी अंती ‘+’ ve  रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-15, ‘+’ ve रिपोर्ट असेलेले उपचारानंतर ‘-’ve रिपोर्ट आलेले नागरीक-01 अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.
0000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक