मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता 1 लाख रुपयांचा धनादेश तहसिलदार प्रियांका कांबळे यांच्याकडे सुपूर्द


वृत्त क्रमांक:-152                                                                                        दि.10 एप्रिल 2020


अलिबाग,जि.रायगड.दि.10(जिमाका)– जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था,धार्मिक संस्था जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने करोना विषाणू विरोधातील या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात, त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19, तसेच जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड या नावाने सुरु करण्यात आलेल्या शासकीय खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी  केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देताना माणगाव तालुक्यातील सेवाभावी संघटना मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून अध्यक्ष मौलाना सरफराज जालगावकर, मुस्लिम समाज नेते अस्लमभाई राऊत, इक्बाल धनसे, मोर्बा गाव  मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता 1 लाख रुपयांचा धनादेश माणगाव तालुक्याच्या तहसिलदार  श्रीमती प्रियांका आयरे-कांबळे यांच्याकडे आज तहसिलदार कार्यालय, माणगाव येथे सुपूर्द केला.
       राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल  तहसिलदार  श्रीमती प्रियांका आयरे-कांबळे यांनी त्यांचे आभार मानले व तालुक्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे,असेही आवाहनही केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक