जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 5 नगरपंचायत क्षेत्रात जंतूनाशक फवारणी टनेलची उभारणी
वृत्त क्रमांक:-153
दि.10 एप्रिल 2020
अलिबाग,दि.10
(जिमाका) :
करोना विषाणूचा प्रादूर्भाव
रोखण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीमध्ये
जंतूनाशक फवारणी करण्यासाठी आदेशित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 10 नगरपरिषद
व 5 नगरपंचायत मध्ये जंतूनाशक फवारणीचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले असून हद्दीतील सर्व रस्ते, सार्वजनिक जागा भाजी
तसेच फिश मार्केट शासकीय कार्यालय इथे सोडियम हायपोक्लोराइट ची फवारणी करण्यात
आली. तसेच मार्केट व सिव्हिल हॉस्पिटल येथे जंतूनाशक फवारणी टनेल उभारण्यात आले
आहेत.
या
कामी नगरपरिषद कर्मचारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, काही ठिकाणी सेवाभावी संस्थांची मदत
घेण्यात आली तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य
संस्थांना रु. 50 हजार इतका निधी सुद्धा वितरित करण्यात आला आहे,अशी माहिती
प्र.जिल्हा प्रशासन अधिकारी (न.प्र.) श्री.महेश चौधरी यांनी दिली आहे.
00000
Comments
Post a Comment