कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 24 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर


वृत्त क्रमांक :- 226                                                                                       दिनांक :- 25 एप्रिल 2020


अलिबाग, जि. रायगड, दि.25 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 24 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
       जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या  (01/03/2020 ते 24/04/2020) - 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा  incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 4 हजार 453, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 1 हजार 862, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 2 हजार 474, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 50, मयत नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-1, पोलादपूर-1) -2, कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-17, पनवेल ग्रामीण 5) एकूण 22.
 सद्य:स्थितीत करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- (पनवेल मनपा-31, पनवेल ग्रामीण-4 उरण-4, श्रीवर्धन-5, कर्जत-1,पोलादपूर-1) एकूण 46 .
रुग्णालयात दाखल असलेल्या नागरिकांची संख्या व त्यांच्या तब्येतीची सद्य:स्थिती-
मुंबई फोर्टिज हॉस्पिटल मुलुंड- 3 (उत्तम),‌ उपजिल्हा रुग्णालय पनवेल-25 (उत्तम), नवी मुंबई मनपा रुग्णालय वाशी- 2 (1 गंभीर, 1 उत्तम), जोगेश्वरी रुग्णालय मुंबई- 2 (उत्तम), अपोलो रुग्णालय बेलापूर - 1 (गंभीर),  सायन रूग्णालय मुंबई- 1 (उत्तम), जगजीवन रुग्णालय मुंबई -1 (उत्तम), एम. जी. एम. रुग्णालय कामोठे - 6(1-गंभीर, 5-उत्तम), वेदांत रुग्णालय  ठाणे- 1 (उत्तम), फोर्टीज रुग्णालय नवी मुंबई - 2  (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय-1  (उत्तम),भाभा रुग्णालय मुंबई-1 (उत्तम)
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
   जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 662, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या- 626, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 512, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 44, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 70, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve  असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)- 46,  ‘+’ ve रिपोर्ट असलेले  उपचारानंतर  ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-22, मयत नागरिकांची संख्या- 02 (पनवेल मनपा-1, पोलादपूर-1 ).
 दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-6 (पनवेल मनपा -5, पनवेल ग्रामीण- 1 ),
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण – 3 (पनवेल मनपा -2, पनवेल ग्रामीण- 1 ),  अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक