आईच्या स्मरणार्थ वर्तक कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहायता निधी करिता 1 लाख रुपयांचा धनादेश केला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द


वृत्त क्रमांक:-156                                                                                        दि.11 एप्रिल 2020


अलिबाग,जि.रायगड.दि.11 (जिमाका)– करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाला मदत म्हणून आई कै.शोभा हरिराम वर्तक यांच्या स्मरणार्थ सर्वश्री.योगेश हरिराम वर्तक, संतोष हरिराम वर्तक,संदेश परशुराम वर्तक,राजेंद्र गजानन वर्तक यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता 1 लाख रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे  आज येथे सुपूर्द केला.
       राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात वर्तक कुटुंबियांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल  जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांचे आभार मानले असून जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे,असे आवाहनही केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक