ओएनजीसीच्या वतीने गरजू व्यक्तींच्या अन्नधान्यांच्या मदतीसाठी, 20 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द



वृत्त क्रमांक :- 214                                                                                       दिनांक :- 23 एप्रिल 2020

                                             


अलिबाग,जि.रायगड.दि.23 (जिमाका)– पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून ओएनजीसी, उरण यांच्याकडून जिल्ह्यातील गरजू व्यक्तींच्या अन्नधान्यांच्या मदतीसाठी 20 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे  व जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे  आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे व उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती हे उपस्थित होते.
       राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल  पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांचे आभार मानले व जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे,असे आवाहनही केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक