जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेंतर्गत 3 लाख 28 हजार 822 शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ वितरित




अलिबाग, रायगड,दि.25 (जिमाका)- करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.   
जिल्ह्यात माहे एप्रिलसाठी अंत्योदय अन्न योजनेंतर्गत एकूण 67 हजार 232 शिधापत्रिकाधारकांना आणि प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेंतर्गत एकूण 2 लाख 61 हजार 590 शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी 78.59 टक्के इतकी आहे.
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई
            जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढ, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक