डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे केंद्र व राज्य शासनाला मदत 37 लाख रुपयांचे डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द



अलिबाग,जि.रायगड.दि.03 (जिमाका) – करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाला मदत म्हणून डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने सर्वश्री.उमेशदादा धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी करिता 16 लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड-19 करिता 16 लाख रुपये आणि जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड करिता 5 लाख रुपये असे एकूण 37 लाख रुपयांचे डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे  आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द केले.
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल  जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांचे आभार मानले व जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनीही मदतीसाठी पुढे यावे, असे  आवाहन केले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक