जिल्ह्यातील तापसदृश्य आजारी व्यक्तींच्या तपासणीसाठी विशेष 52 प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित



 अलिबाग,दि.11 (जिमाका)- करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शासन आणि प्रशासन दिवस-रात्र कार्यरत आहे.   जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या  मार्गदर्शनाखाली आता जिल्ह्यात तापसदृश्य आजारी व्यक्तींच्या तपासणीसाठी विशेष 52 प्राथमिक आरोग्य केंद्रे तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहेत.
             करोना आजारात जसा ताप येतो तसाच इन्फ्लुएंझा एच1एन1, सारी अशा प्रकारच्या इतरही काही आजारांमध्ये रुग्णाला ताप येतो. विविध तापसदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तात्काळ वैद्यकीय तपासणी व्हावी व निदान व्हावे याकरिता ही  प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून तापसदृश्य आजार असलेल्या व्यक्तींची विनामूल्य तपासणी करण्यात  येऊन त्याचे त्वरित निदान करण्यात येणार आहे.
              जिल्ह्यातील अशा विशेष प्राथमिक आरोग्य केंद्रांची ठिकाणे पुढीलप्रमाणे--- पोयनाड, पेढांबे, ढोकवाडे, चिखली, रेवदंडा, अलिबाग,  आंबिवली, खांडस, मोहिली, कडव, नेरळ, कळंब, कशेळे (ग्रा.रू), कर्जत (उप.जि.रू.), माथेरान, खालापूर, लोहोप,चौक (ग्रा.रू), वावोशी, खोपोली,  खालापूर, शिरवली, गोरेगाव,  निजामपूर, साई, नंदवी,  इंदापूर,  माणगाव (उप.जि.रू), बिरवाडी,  विन्हेरे,  दासगाव, वारंध, पाचाड, चिंभावे, महड (ग्रा.रू), म्हसळा (ग्रा.रू), मेंदादी, खामगाव, गडब, जिते, कमार्ली, वाशी, पेण (उप.जि.रू.), आपटा, गव्हाण, आजिवली, नेरे, वावज, पनवेल (उप.जि.रू.), पितळवाडी,  पालचिल, पोलादपूर (ग्रा.रू), आंबेवाडी,  कोकबन, नागोठणे, रोहा (उप.जि.रू.), वालवटी, बोर्लीपंचतन, श्रीवर्धन (उप.जि.रू), तळा,पाली, जांभूळपाडा, सुधागड, कोर्प्रोली, उरण (ग्रा.रू.), बोर्लीमांडळा, आगरदांडा, मुरुड (ग्रा.रू).
     तरी जिल्ह्यातील तापसदृश्य आजार असलेल्या व्यक्तींनी या विशेष प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक