करोना च्या राष्ट्रीय आपत्तीत रायगडवासियांचे उल्लेखनीय दातृत्व सहायता निधीमध्ये आजपर्यंत एकूण 84 लाख 7 हजार 22 रुपयांची आर्थिक मदत जमा




अलिबाग,जि.रायगड.दि.11(जिमाका)– जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था,धार्मिक संस्था जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने करोना विषाणू विरोधातील या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात, त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19, तसेच जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड या नावाने सुरु करण्यात आलेल्या शासकीय खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी  केले आहे.
               या आवाहनाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देताना राष्ट्रीय व सामाजिक जाणिवेतून सामाजिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रायगडवासियांनी आजपर्यंत प्रधानमंत्री सहाय्यता निधी करिता एकूण रू.16 लाख 60 हजार , मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19 करिता एकूण रू.44 लाख 66 हजार 911 तसेच जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड करिता रू.22 लाख 80 हजार 111 अशी एकूण रु.84 लाख 7 हजार 22 इतकी आर्थिक मदत केली आहे.
             राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी  श्रीमती निधी चौधरी यांनी या सर्व दानशूर  व्यक्तींचे,संस्थांचे आभार मानले असून जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनी मदतीसाठी असेच पुढे यावे, असे पुन:श्च आवाहन केले आहे. 
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक