नागरिकांचे मानसिक स्वास्थ सांभाळण्यासाठी ‘मानसमैत्र’ सरसावले पुढे


                                 
            अलिबाग, जि. रायगड, दि.25 (जिमाका) : करोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग चिंताग्रस्त झाले आहे. भारतावरही परिणाम दिसून येत आहे. तसेच करोनामुळे अपरिहार्यपणे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन व जमावबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. याचा परिणाम लोकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही  होत आहे. यापैकी शारीरिक आरोग्याबाबत शासन पातळीवरुन व इतर स्वयंसेवी संस्थांकडून चांगले प्रयत्न होत आहे.  मात्र मानसिक आरोग्याच्या बाबतीत असे प्रयत्न होणेदेखील  आवश्यक आहे.
            संकटकाळात व्यक्तीचे मानसिक संतुलन  तर बिघडतेच पण समाजाचेही संतुलन बिघडून वेगवेगळ्या घटकांना एकत्रित बांधून ठेवण्याच्या क्षमतेवरही आघात होतो.  यातून सावरण्यासाठी नागरिकांना किमान मानसिक प्रथमोपचाराची गरज असते. यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करुन ‘मानसमैत्र’ ही संकल्पना राबवित आहे.   हे प्रशिक्षित कार्यकर्ते आपत्तीच्या काळात नागरिकांवर यशस्वीरित्या मानसिक प्रथमोपचार करतात.
            सध्याच्या आपत्ती प्रसंगी जिल्ह्यात मानसिक प्रथमोपचाराची गरज असून अंधश्रध्दा निर्मूलन समिती रायगड यांच्यातर्फे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.प्रदीप पाटकर, डॉ.हमीद दाभोलकर, डॉ.प्रदीप जोशी यांनी प्रशिक्षित केलेल्या 25 मानसमित्रांना जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथील मनोविकार तज्ज्ञ डॉ.अमोल भुसारे,डॉ.रचना सिंह आणि अलिबाग येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अनिल डोंगरे हे मार्गदर्शन करीत आहेत.  त्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती रायगड यांच्यातर्फे गरजू नागरिकांना मानसोपचार देण्यासाठी हेल्पलाईन सुविधाही सुरु केलेली आहे.  या हेल्पलाईनचा भ्रमणध्वनी क्र.9019914915 असा असून तालुका व ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे प्र.निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक