महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न



अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाली असून या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक श्री.अनिल पारस्कर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी  श्रीमती पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री.रविंद्र मठपती,  जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर,  तहसिलदार श्री.सचिन शेजाळ, तहसिलदार श्री.सतिश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील मोजकेच कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या रायगडवासियांना शुभेच्छा दिल्या व  करोनाच्या संकटातून आपण सर्वजण एकजुटीने बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग चे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला हा ध्वजारोहण कार्यक्रम प्रथमच अत्यंत साधेपणाने पण उत्साहात संपन्न झाला. 
००००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक