औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कामावर हजर होण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन


वृत्त क्रमांक 128                                                                  दि.02 एप्रिल 2020


अलिबाग,जि.रायगड.दि.02 (जिमाका) – जिल्ह्यातील सर्व औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कंपनीमध्ये कर्तव्यावर हजर व्हावे.   सर्व घरमालक व नागरिकांनी औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यापासून अडवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या ह्या अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय उपकरणे बनवितात आणि त्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेची निर्जंतूकीकरणाची आवश्यक ती काळजीही घेतात, त्यामुळे औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कंपनीमध्ये कामावर हजर व्हावे व त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आपल्या आवाहनात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी म्हटले आहे.
मात्र जर औषध निर्माण कंपन्याचे कर्मचारी स्वेच्छेने कामावर हजर झाले नाहीत किंवा त्यांना कामावर हजर होण्यापासून कोणीही रोखले तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कारवाई करण्यात येईल,असेही   त्यांनी सूचित केले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक