Cisco WebEx च्या माध्यमातून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी करोना उपाययोजनांविषयी साधला डॉक्टरांशी सुसंवाद


वृत्त क्रमांक :- 253                                                                                          दिनांक :- 30 एप्रिल 2020


अलिबाग, जि. रायगड, दि.30 (जिमाका) : करोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनामार्फत Cisco WebEx या ॲपच्या माध्यमातून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांशी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून संवाद साधला.
या लाईव्ह सेशनच्या सुरुवातीला आय. एम. ए अलिबाग चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे सर्व डॉक्टरांतर्फे स्वागत केले व अशा माध्यमातून जिल्ह्यातील डॉक्टरांशी थेट संवाद साधल्याबद्दल धन्यवादही  दिले.
            यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील कोविड-19 ची सद्य:स्थितीबाबतची व करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या  प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबतची माहिती सर्व डॉक्टरांना दिली.
यावेळी Cisco WebEx माध्यमातून डॉक्टरांकडून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांना कोविड-19 बाबत विविध प्रश्न विचारण्यात आले.  त्यामध्ये  वैद्यकीय सेवा सुविधा, आरोग्य, ग्रामीण आरोग्य व्यवस्था, नियंत्रण कक्ष ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा पुरविणे, अशा विषयांवरील विविध प्रश्न विचारण्यात आले, त्या प्रश्नांना जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी  समाधानकारक उत्तरे दिली.
Cisco WebEx माध्यमातून डॉक्टर्सनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उत्तरे दिली, त्यातूनही ज्या प्रश्नांच्याबाबतीत शासनस्तरावरुन निर्देश येणे आवश्यक असतील, त्याबाबतीत शासनाला नक्की कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. 
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रविण बोने, वरिष्ठ तांत्रिक अभियंता शार्दूल भोईर, तहसिलदार विशाल दौंडकर,जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक केदार शिंदे, जगन्नाथ वरसोलकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेवटी लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करीत असल्याबद्दल, या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करीत असल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी आभार मानले. या लाईव्ह सेशनमध्ये आय. एम. ए अलिबाग चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर, सचिव, डॉ संजीव शेटकार, डॉ.चंद्रशेखर साठ्ये, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.देवेंद्र जाधव, डॉ.निशिगंध आठवले, डॉ. सहस्त्रबुद्धे, डॉ. ठाकूर  व जिल्ह्यातील जवळपास 160 खाजगी डॉक्टर्स सहभागी झाले होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक