ई-पासद्वारे एकूण 1 लाख 22 हजार ऑनलाईन अर्जांवर कार्यवाही



अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका) : लॉकडाऊनमुळे राज्यातील तसेच परराज्यातील अनेक नागरीक ते ज्‍या ठिकाणी होते तेथेच अडकून राहिले. असेच रायगड जिल्ह्यातही  काही नागरीक अडकून राहिले होते. त्यांना सुखरुपपणे त्यांच्या घरी जाता यावे यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने ई-पासच्या माध्यमातून सकारात्मक पाऊल उचलले. Covid19.mhpolice.in या लिंकवर क्लिक करुन विचारलेली आवश्यक ती माहिती भरल्यावर संबंधित नागरिकाच्या प्रवासाचे कारण पाहून त्यास ऑनलाईन परवानगी देण्यात येते.
याप्रमाणे   दि.2 मे, 2020 पासून आतापर्यंत 1 लाख 22 हजार नागरिकांनी या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज केले असून त्यापैकी 60 हजार 148 अर्ज मंजूर, 57 हजार 616 अर्ज नामंजूर करण्यात आले असून 4 हजार 271 अर्जांवर अद्याप कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती या प्रक्रियेसाठी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणारे उपजिल्हाधिकारी  (रोहयो) रविंद्र मठपती आणि तहसिलदार (महसूल) विशाल दौंडकर यांनी दिली आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक