यांत्रिक मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै 2020 घोषित नौकामालकांनी नोंद घेण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन



अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका) : महाराष्ट्र सागरी मासेमारी आणि नियमन अधिनियम 1981 अंतर्गत मासेवाली बंदी कालावधी दिनांक 1 जून ते 31 जुलै दोन दिवस धरून 61 दिवस करण्याकरिता शासनाने आदेश निर्गमित केले आहेत, त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार 1 जून  ते 31 जुलै 2020 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) असा मासेमारी बंदी कालावधी आदेशित करण्यात आला आहे.
तरी या आदेशाप्रमाणे राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून बारा सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारीला पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नसेल.
 राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून बारा सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास या मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी निर्माण अधिनियम 1981 कलम 14 अन्वये मासेमारीसाठी वापरले जाणारे गलबत जप्त करण्यात येईल तसेच कलम 17 (1) (2)(3) अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल.
दि. 1 जून 2020 पूर्वी मासेमारीला गेलेल्या नौकांना दि. 1 जून 2020 नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कारवाईस पात्र राहतील. त्यामुळे सर्व मासेमारी नौका दि.31 मे 2020 वा तत्पूर्वी बंदरात पोहोचतील याबाबत संबंधित नौकामालकांनी नोंद घ्यावी. तरी या आदेशांनुसार पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत कोणतीही यांत्रिक मासेमारी नौका कोणतेही कारणास्तव समुद्रात जाणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क अधिकारी श्री.सु.रा.भारती, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), रायगड अलिबाग, कार्यालयाचा पत्ता- तिसरा मजला, श्री सिद्धी अर्पाटमेंट, डॉ.पुष्पलता शिंदे हॉस्पिटलच्या समोर, अलिबाग पेण रोड, पिन 402 201, दूरध्वनी क्रमांक 02141-224221, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) श्री.सु.रा.भारती यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक