जिल्ह्यातील 336 गाव/वाड्यांमधील 68 हजार 723 नागरिकांना 37 टँकर्स व 4 अधिग्रहीत विहिरींद्वारे सुरु आहे पाणीपुरवठा


       
                         
अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी ज्या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती आहे, अशा तालुक्यातील गावे, वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून  टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा केला जात असून त्याची माहिती पुढीलप्रमाणे-
उरण तालुक्यातील 5 वाड्यांमधील  998 नागरिकांना 2 खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पनवेल तालुक्यातील 5 गावे, 6 वाड्या-एकूण 11 गाव/वाड्यांमधील एकूण 4 हजार 805 नागरिकांना दोन खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यातील 7 गावे, 19 वाड्या-एकूण 26 गाव/वाड्यांमधील एकूण 5 हजार 951 नागरिकांना तीन खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
खालापूर तालुक्यातील 1 गाव, 4 वाड्या-एकूण 5 गाव/वाड्यांमधील एकूण 1 हजार 550 नागरिकांना दोन खाजगी टँकर व दोन अधिग्रहित विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पेण तालुक्यातील 14 गावे, 86 वाड्या-एकूण 100 गाव/वाड्यांमधील एकूण 22 हजार 250 नागरिकांना 7 खाजगी टँकर्स व एका मदतीच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सुधागड तालुक्यातील 3 गावे, 5 वाड्या - एकूण 8 गाव/वाड्यांमधील  2 हजार 262 नागरिकांना एका खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
रोहा तालुक्यातील 4 गावे, 2 वाड्या-एकूण 6 गाव/वाड्यांमधील  एकूण 2 हजार 896 नागरिकांना सामाजिक संस्थेच्या मदतीच्या  एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
माणगाव तालुक्यातील 4 गावे, 4 वाड्या-एकूण 8 गाव/वाड्यांमधील  एकूण 1 हजार 215 नागरिकांना 2 खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 
महाड तालुक्यातील 10 गावे, 62 वाड्या-एकूण 72 गाव/वाड्यांमधील एकूण 12 हजार 211 नागरिकांना 7 खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 
पोलादपूर तालुक्यातील 30 गावे,57 वाड्या एकूण 87 गाव/वाड्यांमधील एकूण 11 हजार 230 नागरिकांना 6 खाजगी टँकर्सद्वारे  पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  
श्रीवर्धन तालुक्यातील 1 गाव,2 वाड्या एकूण 3 गाव/वाड्यांमधील एकूण 348 नागरिकांना एका खाजगी टँकर व 2 अधिग्रहित विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 
मुरुड तालुक्यातील एका गावातील एकूण 751 नागरिकांना एका खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 
तळा तालुक्यातील 3 गावे, 1 वाडी एकूण 4 गाव/वाड्यांमधील एकूण 2 हजार 256 नागरिकांना, एका खाजगी टँकर्सद्वारे  पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 
अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर,श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या तेरा तालुक्यांमधील एकूण 83 गावे, 253 वाड्या असे मिळून एकूण 336 गाव/वाड्यांमधील एकूण 68 हजार 723 नागरिकांना 35 खाजगी, सामाजिक संस्थेच्या मदतीने दोन असे 37 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक