बेरोजगार युवक-युवतींनी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी “मैत्री” या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा




अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : महाराष्टऱ्‍  राज्यासह संपूर्ण देशात मार्च 2020 पासून कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने दि.23  मार्च 2020 पासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरु आहे.  त्यानंतर राज्यातील ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे.  केंद्र शासनाने नुकतेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमासाठी पॅकेज जाहीर केले आहे.  या पॅकेज अंतर्गत विविध लाभ घेण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांना  बळ देणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन कालावधीदरम्यान व त्यानंतर सुध्दा बऱ्याच सूक्ष्म व मध्यम औद्योगिक उपक्रमांना तसेच सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज मिळण्यासाठी अडचणी, GST परताव्या संदर्भात, सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमाने पुरवठा केलेल्या वस्तू पोटी राज्य शासनाच्या विविध विभागाकडून व सार्वजनिक उपक्रमांकडून प्राप्त व्हावयाच्या रकमेसाठी सहाय्य करणे, तसेच उद्योग  उपक्रम स्थापन करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी मैत्री कार्यालयामध्ये दि.15 मे 2020 पासून हेल्प डेस्क (सहाय्यता कक्ष ) स्थापन करण्यात आला आहे.  
मैत्री कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे- अध्यक्ष, मैत्री कक्ष, कृपा निधी बिल्डींग, पहिला मजला, 09 वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड पियर, फोर्ट, मुंबई-400 038 (दूरध्वनी क्रमांक 022-22622361/22622322) ई-मेल-maitri-mh@gov.in, वेबसाईट :-www.maitri.mahaonline.gov.in/www.di.maharashtra.gov.in असा आहे.
बेरोजगार युवक, युवतींनी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे  महाव्यवस्थापक संदिप पाटील यांनी केले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक