सोशल डिस्टंन्सिंचे योग्य पालन करतायं!... तर मग पाठवा आपले फोटो अन् व्हिडिओ जिल्हाधिकारी निधी चौधरींचे रायगडकर व्यापाऱ्यांना आवाहन



अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका) : करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व त्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासन आणि प्रशासन सर्व स्तरांवर प्रयत्नशील आहेत. करोनाच्या प्रादूर्भावापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायजरचा वापर किंवा साबणाने सतत हात धुणे याबरोबरच सोशल डिस्टंन्सिंग हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.    
       याचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या, पालन करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या, पुढाकार घेणाऱ्या दुकानदार,व्यापारी असोसिएशन किंवा इतर कोणताही व्यापारी घटक यांना जिल्हा प्रशासनाकडून "करोना वॉरियर" म्हणून गौरविले जाणार आहे.
      तरी रायगडमधील दुकानदार, व्यापारी संस्था,असोसिएशन यांनी सोशल डिस्टन्सिंग चे पालन उत्कृष्ट पद्धतीने करीत असल्याचे, इतरांना प्रोत्साहन देतानाचे, मार्गदर्शन करतानाचे उत्तम फोटो dioraigad1@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी  श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक