पनवेल तालुक्यातील उलवे येथील साई गणेश रेसिडेन्सी परिसर वगळला Containment Zone(करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधित क्षेत्रातून



 अलिबाग, जि. रायगड, दि.21(जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल  तालुक्यातील मौजे उलवे येथील व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने साई गणेश रेसिडेन्सी, सेक्टर 20, प्लॉट क्र.113 उलवे व इमारतीच्या आजूबाजूचा परिसर हे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते.
मात्र या क्षेत्रातील विषाणू बाधित व्यक्ती व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून या व्यक्तीचा 14 दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच अन्य कोणत्याही व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही.
त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधित क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक