खालापूर तालुक्यातील चिंचवली गोहे परिसर वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून



                                   
 अलिबाग, जि. रायगड, दि.20(जिमाका) : जिल्ह्यातील खालापूर  तालुक्यातील मौजे चिंचवली गोहे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने चिंचवली गोहे येथील सुनिल सितारात पाटील यांची चाळ व मौजे चिंचवली गोहे हे महसूली गाव हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते.
मात्र या क्षेत्रातील विषाणू बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून या व्यक्तीचा 14 दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच अन्य कोणत्याही व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही.
त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक