वेडात अधिकारी वीर दौडले अडतीस उत्तर रायगडातील 38 अधिकारी तातडीने निघाले दक्षिण रायगडाच्या मदतीला नुकसानग्रस्तांच्या मदतकार्यात गती येण्यासाठी साधणार जलद समन्वय



अलिबाग, रायगड,दि. 06 (जिमाका)- जिल्ह्यात दि. 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुख्यत: दक्षिण रायगडमधील तालुक्यांमध्ये घरे, शेती, फळझाडे  इत्यादींचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून दक्षिण रायगडमधील नुकसानग्रस्त गावांमध्ये तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
             या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयामधील आणि काही क्षेत्रीय अधिकारी दक्षिण रायगडमध्ये नैसर्गिक आपत्ती मदतकार्यासाठी  निघाले आहेत.
            जिल्ह्यात दि.3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे मुख्यत: दक्षिण रायगडमधील तालुक्यांमध्ये घरे, शेती, फळझाडे इत्यादींचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून गावांमध्ये तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात झालेले नुकसान व तातडीने आवश्यक असलेल्या मदतकार्याची व्याप्ती पाहता उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन यांच्याकडे अधिकारी-कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याने मदतकार्यात गती येण्यासाठी व गावांमध्ये तातडीने मदत पोहोचविण्याच्या कामामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), उपजिल्हाधिकारी(रोहयो), उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा), कार्यकारी अभियंता(बांधकाम), कार्यकारी अभियंता(पाणीपुरवठा), जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच उत्तर रायगडमधील क्षेत्रीय स्तरावरील गटविकास अधिकारी, पनवेल, गटविकास अधिकारी, उरण, गटविकास अधिकारी, कर्जत, गटविकास अधिकारी, खालापूर, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, पनवेल, तहसिलदार पनवेल, तहसिलदार उरण, उपविभागीय अधिकारी, कर्जत, तहसिलदार, कर्जत, तहसिलदार, खालापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल, उप उपविभागीय अभियंता पनवेल-1, उपअभियंता, उरण, उप उपविभागीय अभियंता, भिंगारी, उप उपविभागीय अभियंता, कर्जत 1, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अलिबाग, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अलिबाग, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क-सर्व, रायगड कृषी विभाग, कृषी उपसंचालक (SAO Office), उपसंचालक (आत्मा), अन्न व औषध प्रशासन विभाग, सहाय्यक आयुक्त (ड्रग) अन्न व औषध प्रशासन पेण, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन पेण, मत्स्य व्यवसाय विभाग सहाय्यक आयुक्त मस्त्य व्यवसाय रायगड या सर्वांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने दक्षिण रायगडकडे धाव घेतली आहे.
            हे सर्व अधिकारी दक्षिण रायगड येथे नागरिकांना करण्यात येत असलेल्या मदतकार्यात गती येण्यासाठी व गावांमध्ये तातडीने मदत पोहोचविण्याच्या कामांमध्ये जलद गतीने समन्वय साधण्यासाठी गेले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक