वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद झालायं… ? तर मग पाठवा पडलेल्या झाडांचे आणि बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो अन् व्हिडिओ जिल्हाधिकारी निधी चौधरींचे रायगडकरांना आवाहन




अलिबाग, जि.रायगड, दि.6 (जिमाका) : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात प्रचंड असे नुकसान झाले आहे. विशेषत: अनेक ठिकाणी मोठया प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्तेही बंद झाले आहेत.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी झाडे पडून जेथील रस्ते बंद झाले आहेत, याची माहिती प्रशासनाला तातडीने मिळावी यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हिडीओ 8275152363 या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवावेत. तसेच 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी.
नागरिकांनी वरील व्हॉटस्अप क्रमांकावर पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर व 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदविल्यानंतर प्रशासनातील संबंधित यंत्रणेला नागरिकाने नोंदविलेली ती तक्रार तात्काळ कळविण्यात येईल व झाड पडल्यामुळे बंद झालेला संबंधित रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यात येईल.
      तरी रायगडकरांनी पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हिडीओ 8275152363 या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवावेत. तसेच 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक