रायगडकरांनो चला एकत्र मदत करूया जिल्हा प्रशासनाची रायगडकरांना मदतीची हाक




अलिबाग, रायगड,दि. 6 (जिमाका)- जिल्ह्यात दि. 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुख्यत: दक्षिण रायगडमधील तालुक्यांमध्ये घरे, शेती, फळझाडे  इत्यादींचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून या गावांमध्ये तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
            येथील नागरिकांना अधिक मदत मिळण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अलिबाग येथे उघडण्यात आले असून त्याचा बचत खाते क्रमांक 38222872300 आहे.
            जिल्हा प्रशासनाबरोबरच जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था या रायगडमधील नुकसान  झालेल्या नागरिकांना  मदत करू इच्छितात, त्या सर्व कंपन्या, संस्था आणि नागरिकांनी जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड या नावाने सुरु करण्यात आलेल्या बचतखात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
     या बचत खात्याची माहिती पुढीलप्रमाणे--
जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड
(DISTRICT DISASTER RESPONSE FUND)
AC NO.:-38222872300
STATE BANK OF INDIA
IFSC CODE:- SBIN0000308
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक