खालापूर तालुक्यातील मौजे कुंभिवली आदिवासीवाडी वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून



अलिबाग, जि. रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील खालापूर  तालुक्यातील मौजे कुंभिवली आदिवासीवाडी येथील  करोना बाधित रुग्ण यांचे राहते घर  क्र.403 व बाळाराम देहू हिलम घर क्र.317, ताई मनोज वाघमारे यांचे राहते घर व नामदेव रामा हिलम घर क्र.408 सर्व राहणार कुंभिवली आदिवासीवाडी येथील एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते.
मात्र आता Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित केलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही .
त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक