पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील साई निल दर्शन को.ऑ.हौ.सो.वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून




अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या साई निल दर्शन को.ऑ.हौ.सो., विचुंबे, ता.पनवेल ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली होती.
मात्र आता करोना बाधित रुग्णाला रुग्णालयातून  दि.13 मे 2020 रोजी डिस्चार्ज मिळाल्याने. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तीही  अद्यापपर्यंत करोना विषाणूमुळे संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही. 
त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक