अलिबाग तालुक्यातील सरपंच पदाकरिता आरक्षण सोडत सभा दि.16 डिसेंबर रोजी

 


 

  अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका) :- मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 164 नियम 2 अ (1) ते (6) प्रमाणे सन 2020 -2025 च्या निवडणुकीकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे.

 अलिबाग तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीची सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण करिता राखून ठेवण्यात आलेली आहेत, त्या ग्रामपंचायतींपैकी सोडत पद्धतीने सरपंच पदे आरक्षित करण्यासाठी बुधवार, दि. 16 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.  या सभेत सोडत पद्धतीने सरपंच पदे आरक्षित करण्यात येणार आहेत.

 तरी या सभेसाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड