राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :-  राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

राज्यात लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम झाला होता. परंतु सध्या उद्योग-व्यवसाय पूर्ववत सुरु होत आहेत. अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मा.मंत्री महोदय श्री. नवाब मलिक साहेब यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने www.roigar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग, व्यवसाय यांना नववी उत्तीर्णपासून दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, कोणत्याही विषयातील पद्वी तसेच बी.ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची किमान 65 ते 70 हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक युवक-युवतींनी 13 डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगाराच्या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्‍त शा.गि.पवार यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यातील या आस्थापनांनमध्ये सुमारे 2 हजार रिक्त पदांची भरती होणार आहे. या प्रमुख आस्थापना पुढीलप्रमाणे----

सेक्युरिटी अंड इंटेलिजन्स सर्विस इंडिया लिमिटेड, जॉन्सन मॅथ्यू केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड तळोजा,

पोस्को महाराष्ट्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड, मॅट3 एक्स इंजीनियरिंग सर्विस, स्मायली हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, एस. पी. कॅड सर्विसेस, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, स्माईल इंट्रा ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, क्रिस्टल इंडिया लिमिटेड पाताळगंगा, इन्नोवस्यन्थ टेक्नॉलॉजीस इंडिया लि., टाटा स्टील बी. एस. एल. लिमिटेड, ऐझिस ग्लोबल, अपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड तळोजा, एल अँड टी कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल, सक्षम स्किल ॲकॅडमी, प्रगती आय. टी. सर्विसेस,  क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड, सी.जी. मोटर्स, सी.जी. मोटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, क्रेविडा इत्यादी.

अशी करा ऑनलाइन नोंदणी -

हा रोजगार मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच.

रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी संकेतस्थळ  www.rojgar.mahaswayam.gov.in

होमपेजवरील जॉब सीकर (Job Seekar) नोकरी साधक या लॉगिनमधून युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉग-इन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर यावर क्लिक करुन प्रथम मुंबई विभाग आणि त्यानंतर रायगड जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी व आपला पसंतीक्रम निवडावा. या मेळाव्यात महाराष्ट्रातील कोणत्याही नोकरीसाठी इच्छुक उमेदवारास सहभाग नोंदविता येईल. यानंतर उद्योजकनिहाय रिक्त पदांची माहिती घ्यावी. आवश्यक पात्रतेनुसार ऑनलाईन पध्दतीने पसंतीक्रम नोंदवून मेळाव्यात सहभागी होता येईल.

तरी या संधीचा गरजू युवक-युवतींनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त शा.गि.पवार यांनी केले आहे.

0000000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड