जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 716 लाभार्थ्यांनी घेतला लसीकरणाचा लाभ

 

वृत्त क्रमांक:- 282                                                         दिनांक:- 08 एप्रिल 2021

 


अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- शासनाकडून आतापर्यंत रायगड जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसचे 1 लाख 34 हजार 200 व कोव्हॅक्सिनचे 15 हजार 820 डोस प्राप्त झाले आहेत.    

कोविशिल्डच्या लसींचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे 28 हजार 280, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे 34 हजार 370, पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे 48 हजार 500, खाजगी रुग्णालयांना 6 हजार 500, आर्मड् फोर्सेसना 3 हजार 950 असे वितरण झाले होते.

त्याचप्रमाणे कोव्हॅक्सिनच्या एकूण 15 हजार 820 लस प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे 9 हजार 820 तर पनवेल महानगरपालिकेकडे 6 हजार लस वितरित करण्यात आल्या होत्या.

जिल्ह्यात दि.08 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 84 लसीकरण केंद्रांपैकी 59 लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून यापैकी 25 लसीकरण केंद्रे लस उपलब्ध नसल्याकारणामुळे तात्पुरती अकार्यान्वित झाली आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर ही लसीकरण केंद्रे पूर्ववत कार्यान्वित होतील.

आजपर्यंत एकूण 1 लाख 58 हजार 662 लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी नोंद केली आहे. नोंद केलेल्यांपैकी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या 22 हजार 506 असून यापैकी 18 हजार 567 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 7 हजार 099 जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे.

जिल्ह्यात 28 हजार 685 फ्रंटलाईन वर्कर्सनी नोंद केली असून त्यापैकी 17 हजार 632 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 5 हजार 366 जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे.

जिल्ह्यातील वय वर्षे 45वरील 1 लाख 7 हजार 471 नागरिकांनी नोंद केली असून त्यापैकी 85 हजार 947 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 1 हजार 105 जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण 1 लाख 35 हजार 716 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

आतापर्यंत लस घेतलेल्यांपैकी फक्त 117 जणांना किरकोळ त्रास जाणवला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

तसेच जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भाग मिळून एकूण 45 कोविड सुविधा केंद्र सुरू असून 2 हजार 331 विलगीकरण बेड उपलब्ध आहेत तर ऑक्सिजन सुविधेसह 1 हजार 205 बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण 171 व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत.   

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक