माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी प्राप्त पदक पुराव्यासह माहिती दि.15 एप्रिल पूर्वी सादर करण्याचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- सन-1962, सन-1965, सन-1971 च्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या अनुक्रमे  LADAKH-1962 CLASP/NEFA1962 CLASP, रक्षा पदक/समर सेवा स्टार, संग्राम पदक अशा  पदकांनी सन्मानित  व निवृती वेतन मिळत नसलेल्या माजी सैनिक किंवा त्यांच्या  पश्चात माजी सैनिक विधवांची  माहिती दि.15 एप्रिल 2021 पूर्वी सैनिक कल्याण विभागामार्फत शासनास सादर करावयाची आहे.

त्यासाठी संबंधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी प्राप्त पदक पुराव्यासह आपली माहिती तात्काळ जिल्हा सैनिक कल्याण रायगड-अलिबाग यांच्याकडे स्वहस्ते सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग मेजर (निवृत) सुभाष सासने यांनी केले आहे. 

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक