“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! मास्क वापरणे,सॅनिटायझरचा वापर करणे,हात वारंवार स्वच्छ धुणे,सोशल डिस्टंन्सिंग पाळणे या चतु:सूत्रीचे करा पालन जिल्ह्यात 69 हजार 500 जणांनी केली करोनावर मात

 


 

          अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- आतापर्यंत म्हणजेच दि. 6 एप्रिल 2021 पर्यंत जिल्ह्यातील 69 हजार 500 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून 845 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-3 हजार 299, पनवेल ग्रामीण-761, उरण-143, खालापूर-208, कर्जत-197, पेण-227, अलिबाग-382, मुरुड-22, माणगाव-152, तळा-9, रोहा-105, सुधागड-47, श्रीवर्धन-42, म्हसळा-20, महाड-72, पोलादपूर-14 अशी एकूण 5 हजार 700 झाली आहे.

          कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-34 हजार 442, पनवेल ग्रामीण-9 हजार 136, उरण-2 हजार 303, खालापूर-3 हजार 139, कर्जत- 1 हजार 982, पेण-4 हजार 277, अलिबाग-5 हजार 309, मुरुड-463, माणगाव- 2 हजार 111, तळा-172, रोहा-2 हजार 622, सुधागड-456, श्रीवर्धन-451, म्हसळा-319, महाड- 1 हजार 885, पोलादपूर-433 अशी एकूण 69 हजार 500 आहे.         

             दि.6 एप्रिल रोजी दिवसभरात पनवेल मनपा-256, पनवेल ग्रामीण-55, उरण-0, खालापूर-22, कर्जत-10, पेण-7, अलिबाग-17,  मुरुड-3,  माणगाव-11, तळा-0,  रोहा-4,  सुधागड-0,श्रीवर्धन-7,  म्हसळा-0,  महाड-21, पोलादपूर-0 असे  एकूण 413 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

          आतापर्यंत पनवेल मनपा-685, पनवेल ग्रामीण-150, उरण-124, खालापूर-128, कर्जत-108, पेण-115, अलिबाग-149, मुरुड-28, माणगाव-39, तळा-11, रोहा-94, सुधागाड-26, श्रीवर्धन-22, म्हसळा-14, महाड-77, पोलादपूर-23 असे एकूण 1 हजार 793 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

        दि.6 एप्रिल रोजी दिवसभरात कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-471, पनवेल ग्रामीण-111, उरण-12, खालापूर-19, कर्जत-31, पेण-48, अलिबाग-57, मुरुड-3,  माणगाव-40,तळा-2, रोहा-20, सुधागाड-4, श्रीवर्धन-8, म्हसळा-9, महाड-9, पोलादपूर-1 असे एकूण 845 ने वाढ झाली आहे.

         आजच्या दिवसात अलिबाग-1, महाड-1  अशा 2 व्यक्तींची मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

          आतापर्यंत जिल्ह्यातून 3 लाख 66 हजार 536 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 145 आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक