वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आहे सज्ज

 


अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका):- दिवसेंदिवस राज्यात कोविड-19 चा प्रादूर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी या संकटाचा धैर्याने मुकाबला करणे आवश्यक आहे.  शासन आणि प्रशासन जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.

    मागच्या काही काळात शासन व प्रशासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले असून, आरोग्य विषयक अधिक सोयी-सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.

शासनाने नुकतेच वय वर्ष 45 वरील सर्व नागरिकांना प्रतिबंध लस देण्याचा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे.  करोनाच्या दोन लसींचा डोस पूर्ण केल्यानंतर आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे आणि समजा चुकून करोना झाला, तरीदेखील या रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रभावामुळे संबंधित व्यक्ती गंभीर आजारी होणार नाही व ते करोनातून निश्चितपणे पूर्ण बरे होतील. तरी वय वर्ष 45 वरील प्रत्येक नागरिकाने जवळच्या लसीकरण केंद्रात जावे व लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग (2 केंद्र), उप जिल्हा रुग्णालय पेण, माणगाव, कर्जत,श्रीवर्धन (2 केंद्र), रोहा,  ग्रामीण रुग्णालय उरण, महाड, पोलादपूर, मुरुड, म्हसळा, चौक,  जेएनपीटी उरण, आर सी एफ हॉस्पिटल अलिबाग, खोपोली नगर परिषद, लायन्स हेल्थ क्लब अलिबाग.

  जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील पेण- वाशी प्राथमिक आरोग्य केंद्र, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र,गडब प्राथमिक आरोग्य केंद्र, जिते प्राथमिक आरोग्य केंद्र. पनवेल- नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र, वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्र, आजिवली प्राथमिक आरोग्य केंद्र, गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र, आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र. कर्जत- कडाव प्राथमिक आरोग्य केंद्र, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहीली प्राथमिक आरोग्य केंद्र,कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र. म्हसळा- मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्र. रोहा- नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र,कोकबन प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेवाडी. श्रीवर्धन- बोर्लिपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्र, वाळवटी प्राथमिक आरोग्य केंद्र. माणगाव- इंदापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र, साई प्राथमिक आरोग्य केंद्र. खालापूर- खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्र. महाड- दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र,चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्र. सुधागड-जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, पाली प्राथमिक आरोग्य केंद्र. तळा- तळा प्राथमिक आरोग्य केंद्र.  उरण- कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र. पोलादपूर- पित्तळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र. मुरुड- बोर्लीमांडला प्राथमिक आरोग्य केंद्र. अलिबाग- धोकवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्र, रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र.

याशिवाय पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील एम.जी.एम मेडिकल कॉलेज-कामोठे, येरळा मेडिकल ट्रस्ट मेडिकल कॉलेज-खारघर, टाटा हॉस्पिटल-खारघर, लाईफ लाईन हॉस्पिटल (शासकीय) - पनवेल, सुअस्थ हॉस्पिटल (प.म.न.पा.)-पनवेल, पनवेल हॉस्पिटल, श्री साई हॉस्पिटल, उन्नती हॉस्पिटल, एम.जी.एम. मेडिकल कॉलेज कळंबोली, लाईफलाईन हॉस्पिटल(खाजगी)-पनवेल, बिरमोळे हॉस्पिटल-पनवेल, पटवर्धन हॉस्पिटल-पनवेल, श्री सिद्धिविनायक, उपजिल्हा रुग्णालय-पनवेल, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1, 4-कळंबोली, 5-खारघर, 6-कामोठे, सुअस्थ हॉस्पिटल (खाजगी)- पनवेल.

तसेच व्यंकटेश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल-तळोजा, दांडेकर हॉस्पिटल व अतिदक्षता विभाग-खारघर, कॅलाड्रिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल-देवीचापाडा, सत्यम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल-कळंबोली, रिलायन्स इंडस्ट्रीज, लोधिवली ता.खालापूर, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड फॅमिली वेल्फेअर हॉस्पिटल-नागोठणे,तालुका रोहा, संपूर्ण रेगे हॉस्पिटल- रसायनी, तालुका खालापूर, आदित्य नर्सिंग होम-तालुका महाड, अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण 75 लसीकरण केंद्रे कार्यान्वित  असून या केंद्रांमधून लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरु आहे.

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भाग मिळून एकूण 45 कोविड सुविधा केंद्र सुरू असून 2 हजार 331 विलगीकरण बेड उपलब्ध आहेत तर ऑक्सिजन सुविधेसह 1 हजार 205 बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण 171 व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत.   

 शासनाने आतापर्यंत रायगड जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसचे 1 लाख 34 हजार 200 व कोव्हॅक्सिनचे 15 हजार 820 डोस उपलब्ध करून दिले आहेत.    

कोविशिल्डच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे 28 हजार 280, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे 34 हजार 370, पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे 48  हजार 500, खाजगी रुग्णालयांना 6 हजार 500, आर्मड् फोर्सेसना 3 हजार 950 असे वितरण झाले असून 12 हजार 600 लस अद्याप शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिन 15 हजार 820 लस प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे 9 हजार 820 तर पनवेल महानगरपालिकेकडे 6 हजार लस वितरित करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात 6 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 75 लसीकरण केंद्रातून 1 लाख  15 हजार 358 जणांना लस टोचण्यात आली आहे तर 13 हजार 576 जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. आतापर्यंत लस घेणाऱ्यांपैकी फक्त 117 जणांना किरकोळ त्रास जाणवला असल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्कात असून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.जगताप, डॉ.गजानन गुंजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, डॉ.रिहाना मुजावर, डॉ.मनिषा चांडक, पनवेल कोविड रुग्णालयाचे डॉ. बसवराज लोहारे, डॉ.सचिन संकपाळ, लस शीतसाखळी नियंत्रण व्यवस्थापक श्री.सूर्यवंशी, भांडार व्यवस्थापक विकास पाटील व इतर सर्व आरोग्य व विविध शासकीय यंत्रणा जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याविषयी उपाययोजना राबविण्यात अहोरात्र प्रयत्नशील आहेत.

  सद्य:स्थितीत राज्यात वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने  शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार दि.05 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 8.00 वाजल्यापासून ते दि. 30 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत सुधारित प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करुन आपण आपले कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य निभावणे, ही आताच्या परिस्थितीनुसार काळाची गरज बनली आहे.

मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे,सोशल डिस्टंन्सिंग पाळणे या चतु:सूत्रीचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, घरीच राहावे, सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.   

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक