कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुधारित मनाई आदेश जारी अत्यावश्यक सेवेत अन्य काही बाबींचा समावेश

 

 

अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- राज्यात वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बधांच्या अनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दि.05 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 8.00 वा. पासून ते दि.30 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 11.59 वा. पर्यंत कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड निधी चौधरी यांनी फौजदारी दंड प्रक्रियासंहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार कलम 144 (1) (3) नुसार कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवेत खालील बाबीदेखील समाविष्ट असल्याची माहिती दिली आहे.

अत्यावश्यक सेवेमध्ये पेट्रोल पंप व पेट्रोलियम पदार्थाशी निगडीत सेवा, गॅस पुरवठा, सर्व प्रकारची कार्गो सेवा, सर्व प्रकारची मालवाहतूक सेवा, डाटा सेंटर/क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हाईडर/टेलिकॉम सर्विस/आयटी सर्व्हिसेस सपोर्टंग क्रिटीकल, ईन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस, शासकीय व खाजगी सुरक्षासेवा देणाऱ्या संस्था,फळ विक्रेते, चिकन, मटण, अंडीची दुकाने, मासे विक्री, ऑप्टीकल सर्व्हिसेस, चष्म्यांचे क्लिनिक इ.,राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यांना पार्सल सेवा देता येईल, गॅरेज सेवा, या सेवांचा समावेश आहे.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रामधील अत्यावश्यक सेवा यामध्ये समाविष्ट असलेली दुकाने ही दररोज सकाळी 8.00 ते सायंकाळी 7.00 या कालावधीत सुरु राहतील. संबंधित दुकान मालक व काम करणारे कामगार यांनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घेणे आवश्यक व हे लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील पंधरा दिवासापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (RT-PCR) स्वत: जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम दि.10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.  

तसेच या दुकानांमध्ये येणाऱ्या व्यक्ती/ग्राहकाद्वारे फेस कव्हर (Face Cover)/मुखपट्टी (Masks) परिधान केलेली असेल तसेच त्यांच्यामध्ये आवश्यक सामाजिक अंतर (Social Distance) राखले जाईल, या अधीनतेने ही दुकाने कार्यान्वित राहतील. संबंधित दुकाने/ आस्थापनांमध्ये अतिरिक्त ग्राहक आल्यास त्यांना प्रतिक्षाधीन ठेवावे व त्यांच्यामध्ये आवश्यक सामाजिक अंतर (Social Distance) राहील, याची दक्षता घ्यावी. त्याकरीता आवश्यकतेनुसार ठराविक अंतरावर विशिष्ट चिन्हे / निशाण्या (Marking) आरेखित कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

खाजगी संस्था या घटकांमधील सेबी आणि सेबीमध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था (उदा.स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन इ.), रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेले संस्था, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर इ., सर्व नॉन बँकीग वित्तिय संस्था, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, विधीतज्ञ, C.A. C.S यांची कार्यालये, कस्टम हाऊस एजंट्स / लस (Vaccines), जीवनारक्षक परवानाधारक मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स, लायसन्स्ड मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर लसांच्या जीवनशैलीशी संबंधित औषधे फार्सक्युटिकल उत्पादने,या खाजगी संस्था दररोज सकाळी 7.00 वा. पासून ते रात्री 8.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु राहतील.

या संस्थामध्ये कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील व हे लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्या- संदर्भातील पंधरा दिवासापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (RT-PCR) स्वत: जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम दि.10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.  या बाबींचे उल्लंघन करणारी व्यक्ती रु.1 हजार  इतक्या रक्कमेच्या दंडनीय कारावाईस पात्र ठरेल

            ट्रेन,बस, विमानाद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तीस रात्री 8.00 नंतर व शनिवारी व रविवार या कालावधीत संबधित रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळावर जाणेसाठी व परत घरी येण्यासाठी त्यांच्याकडे वैध तिकीट असल्याचे अधिनतने प्रवासास मान्यता असेल.

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांस, व्यक्तीस खाजगी बसेस व खाजगी वाहनाने दररोज रात्री 8.00 सकाळी 7.00 वाजेपर्यंत व शनिवारी व रविवारी सुध्दा या कालावधीत त्यांच्याकडे संबधित औद्योगित संस्थेने दिलेले ओळखपत्र धारण करण्याच्या अधीनतने प्रवासास मान्यता असेल.

एखाद्या विद्यार्थ्यास स्वत: प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित राहावयाचे असल्यास, अशा विद्यार्थ्यांस रात्री देखील परीक्षा केंद्रावर, घरी जाण्यासाठी प्रवास त्यासंदर्भातील वैध प्रवेशपत्र धारण करण्याच्या अधीनतेने करता येईल.

 जे लग्न समारंभ शनिवार व रविवारी आयोजित केलेले आहेत, अशा लग्न समारंभांच्या आयोजनासंदर्भात संबधित तहसिलदार यांनी स्थानिक परिस्थती विचारात घेऊन निर्बंधाच्या अधीनतेने म्हणजेच 50 लोकांच्या मर्यादेत मान्यता देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेशित केले आहे.

 याचबरोबर घरोघरी घरगुती काम करणारे नोकर, ड्रायव्हर, स्वयंपाकी यांना रात्री प्रवास करण्यास व शनिवारी व रविवारी काम करण्यास अनुमती देण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडील रक्त संक्रमण सेवा ही आत्यावशक सेवा असल्याने कोविड-19 च्या शासनाने तसेच राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ऐच्छिक रक्तदान शिबीर आयोजित करता येतील.

हा आदेश दि.05 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 8.00 वा. पासून ते दि.30 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 11.59 वा. पर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक