नवीन “आपले सरकार सेवा केंद्रा”साठी इच्छुकांनी अर्ज करावेत

 

अलिबाग जि रायगड दि.9 (जिमाका):- राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्र, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना आपले सरकार सेवा केंद्र" हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात आले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (2011 च्या जनगणनेनुसार) किमान 2 केंद्रे स्थापन करण्यात येतील. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद 10 हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र स्थापन करण्यात येईल.

 जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रा साठी इच्छुक नागरिकांनी वरील संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासंह दि.11 मे 2021 पर्यत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे सादर करावेत.

आपले सरकार सेवा केंद्रा बाबत अधिकमाहितीसाठी माहिती व तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा.

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागणी  कालावधी 30 दिवस, दि.12 एप्रिल 2021 ते दि.11 मे 2021, प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रां च्या मागणी अर्जांची छाननी कालावधी 28 दिवस, दि.12 मे 2021 ते दि.09 जून 2021, प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रां च्या मागणी अर्जांवर जिल्हास्तरीय कार्यवाही करिता कालावधी 21 दिवस, दि.10 जून 2021 ते दि.01 जुलै 2021.

जिल्ह्यातील शहरी व एकूण ग्रामीण केंद्रांची माहिती :- एकूण ग्रामीण केंद्र-884, कार्यरत केंद्र-243, रिक्त केंद्र 651,  शहरी एकूण केंद्र-105, कार्यरत केंद्र-82, रिक्त केंद्र 42.

   नियोजित केंद्र :- 693, नियोजित केंद्राची तालुकानिहाय संख्या पुढीप्रमाणे :- अलिबाग-39, कर्जत-40, खालापूर -39, महाड-112, माणगाव- 51, म्हसळा:-35, मुरुड-14, पनवेल- 105, पेण-51. पोलादपूर-38, रोहा-46, श्रीवर्धन-36, सुधागड- 31,तळा- 22, उरण- 34.

तरी इच्छुक नागरिकांनी विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक