महाड नगरपरिषद आणि जिल्हा अग्रणी बँक,बँक ऑफ इंडिया रायगड तर्फे 26 ऑगस्ट रोजी कर्ज मेळाव्याचे आयोजन

 


        अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका) :- महाड नगरपरिषद आणि जिल्हा अग्रणी  बँक ,बँक ऑफ इंडिया रायगड तर्फे

दि.26 ऑगस्ट 2021 रोजी कर्ज मेळाव्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, चवदार तळे ,महाड येथे सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. महाड शहरातील सर्व बँका यामध्ये सहभागी होणार आहेत. या कर्ज मेळाव्यामध्ये छोट्या व्यवसायिकांना मुद्रा योजनेंतर्गत  शिशु कर्ज  (पन्नास हजार  पर्यंत) , हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे यांच्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत (दहा हजार पर्यंत) आणि शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज या  योजनेकरिता अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

            याकरिता आपले खाते ज्या बँक शाखेमध्ये आहे तेथे 1) अर्ज, 2) आधार कार्ड किंवा पॅन कार्ड रेशन कार्ड, 3) फोटो इत्यादी कागदपत्रे घेऊन आल्यानंतर आपल्याला संबंधित कर्जाबद्दल अर्ज व मार्गदर्शन मिळेल. तरी या सूवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले व्यवसाय पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन  जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी  यांनी  महाड शहरवासियांना  केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक