भूजल साक्षरता अभियानांतर्गत जलजागृती फिरत्या चित्ररथाचे हिरवा झेंडा दाखवून अनावरण

 

वृत्त क्रमांक:- 877                                                                   दिनांक :-23 ऑगस्ट 2021

 


अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागाला 50 वर्ष पूर्ण झाल्याने आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी व अतिरिक्त संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे डॉ.प.ल.साळवे यांच्या प्रेरणेने राज्यात भूजल साक्षरता अभियानांतर्गत जलजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुषंगाने जलजागृती फिरत्या चित्ररथाचे आज (दि.23ऑगस्ट) रोजी रायगड जिल्हा परिषदेतील मान्यवरांच्या उपस्थितीत चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून अनावरण करण्यात आले. या चित्ररथाच्या माध्यमातून जलसाक्षरता अंतर्गत संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन) डॉ. ज्ञानदा  फणसे, कार्यकारी अभियंता, रा. जि. प. पाणी पुरवठा विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.अरविंद येजरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक एच.एम.संगनोर, भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक श्री.आर.एन.गिरे, जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, जि.प. उपअभियंता (यांत्रिकी) गणेश देशमुख, जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा केमिस्ट श्रीमती स्नेहा घासे व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक