“स्पर्धा परीक्षा आणि मी..!!” विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात युवकांनी सहभागी व्हावे --सहायक आयुक्त अमिता पवार

 


 

  अलिबाग,दि.23(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग यांच्या वतीने विविध मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येतात. जिल्हयातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षांची ओळख होऊन त्यांच्यामध्ये अधिकारी बनण्याची जिद्द निर्माण व्हावी, याकरिता जिल्हा पातळीवर गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानुषंगाने बुधवार,दि. 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वा. स्पर्धा परीक्षा आणि मी..!! या विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.  या सत्रामध्ये जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप हे सहभागी युवकांना आपले व्यक्तिमत्व, स्पर्धा परीक्षा, त्याबाबतची तयारी यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रामध्ये ऑनलाईन सहभागी होण्यासाठीची लिंक Join with Google Meet :- https://meet.google.com/cpu-gkap-rnk?hs=122&authuser=0 अशी आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक