मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामधील जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक--निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे

 

 

रायगड दि.12 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामध्ये प्रसिध्द करावयाची जाहिरात राज्य अथवा जिल्हास्तरावरील माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्व-प्रमाणित करणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यानी दिली.

 

भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस पूर्व प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश  सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना 1 एप्रिल रोजीच्या पत्राद्वारे दिले आहेत.

कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य अथवा जिल्हास्तरावरील माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करु नये.

राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती  यांना उक्त कालावधीत प्रिंटमीडियामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास अर्जदारांनी जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडे अर्ज करावा.

        मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्ण-प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील सदर जाहिराती पूर्व प्रमाणिकरण साठी माध्यम पूर्व प्रमाणिकरण समिती, माध्यम कक्ष, जिल्हा माहिती कार्यालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी, हिराकोट तलाव जवळ, अलिबाग जिल्हा रायगड येथे विहित नमुन्यात व कालावधीत अर्ज करावा.

     ००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड