निवडणूक खर्च निरीक्षक श्री.त्रिपाठी यांची जिल्हा माध्यम कक्षास भेट

 


रायगड(जिमाका),दि.13:-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024,  32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमणी त्रिपाठी यांनी जिल्हा माध्यम कक्षात भेट देऊन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

          जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आले असून उमेदवारांच्या प्रचार जाहिराती याचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते. यासह निवडणुकीची मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीमध्ये या पक्षाचा सहभाग आहे आधी बाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली.

              श्री.त्रिपाठी यांनी माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यम द्वारे प्रसिद्धी, तसेच विविध दैनंदिन अहवाल बाबत पाहणी त्यांनी केली.

निवडणूक निरीक्षक श्री. त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी दिले. तसेच पेडन्यूज बाबत अधिक दक्ष रहावे. उमेदवाराच्या प्रचारावर आणि प्रसिद्धी साहित्यावर होणारा खर्च, खर्च पथकाला विहित नमुन्यात सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी  उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, खर्च पथक प्रमुख राहुल कदम, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, माहिती अधिकारी किरण वाघ तसेच जिल्हा माध्यम कक्षातील कर्मचारी श्री.विठ्ठल बेंदुगडे, श्री.जयंत ठाकूर, स्वरुप हुले, श्रीमती अर्पणा शिंदे, श्रीमती क्रांती पाटील, प्रफुल पाटील, जयवंत शिंदे, श्रीमती बागाव आदी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड