निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात
रायगड,दि.23 (जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पनवेल या संस्थेतील निर्लेखित निरुपयोगी व भंगार साहित्याची दरपत्रके मागवून विक्री करावयाची आहे. सदरील भंगार साहित्य संबंधित विभागामध्ये ठेवण्यात आलेले असून सर्व साहित्य आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने विक्री करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निरनिराळ्या व्यवसायामधील जुन्या व निकामी झालेल्या यंत्रसामुग्री तसेच भंगार व निरुपयोगी साहित्याचे एम.एस.स्क्रॅप, कॉपर स्क्रॅप, अॅल्युमिनियम स्क्रॅप, ट्युबपट्टी स्क्रॅप, कास्टिंग जॉब इत्यादी विविध प्रकारच्या बाबी समावेश असून या निविदा प्रक्रियेकरीता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात, असे आवाहन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एन.के. चौधरी यांनी केले आहे.
ज्या खरेदीदाराचे दर कमाल असतील अशा पात्र जी.एस.टी. नोंदणी धारक खरेदीकारास भंगार साहित्याची विक्री करण्यात येईल. विक्री करावयाच्या वस्तू संबंधित विभागामध्ये दि.26 जून ते दि.05 जुलै 2025 या कालावधीत सकाळी 11.00 ते 4.00 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पहावयास मिळतील. या कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहित नमुन्यातील अर्ज प्रति निविदा रु. 300/- (नापरतावा) संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येतील. सदर नमुन्यातील अर्जातील माहिती अचुकपणे निविदेसोबत रु. 3 हजार अनामत रक्कम म्हणून जमा करणे अनिवार्य असेल. सदर रक्कमेचा धनाकर्ष, Registrar, Industrial Training Institute Panvel, Dist-Raigad. यांचे नावाने डिडी. च्या स्वरुपात करावा. इच्छुक जी.एस.टी. धारक भंगार खरेदीदारांनी वर उल्लेखिलेला विहित नमुन्यातील नमुना अर्ज डिडी. सह दि.05 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सिलबंद लिफाफयात कार्यालयात जमा करावे. संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा व त्यामध्ये फेरबदल करण्याचा पूर्ण अधिकार प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल हे राखुन ठेवीत आहेत.
सदर सिलबंद निविदा दि.07 जुलै 2025 रोजी स.11.00 वाजता समिती सदस्यांमार्फत प्राचार्यांच्या दालनात उघडण्यात येतील.
000000
Comments
Post a Comment